सिल्लोड, (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टी व ढगफुटी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. त्या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार सतीश सोनी यांची भेट घेऊन या शेतकऱ्यांना काय मदत देत आहात पंचनामे कशा पद्धतीने केले आहे.
मदती सरसकट आहे की, कशी विचार नाही केली. व सरकारने कशा पद्धतीचे पंचनामे करायला सांगितले असेही विचारले. त्यावेळी तहसीलदार सतीश सोनी यांनी विनोद घोसाळकर यांना असे सांगितले की, सिल्लोड तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेल्या
११ मंडळातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करत आहोत व केलेले आहे.
त्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे जी मदत आहे ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी आम्ही दक्षता घेत आहोत, अशी सुद्धा माहिती तहसीलदार सतीश सोनी यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांना दिली आहे.
त्यावेळी विनोद घोसाळकर यांनी तहसीलदारांनी दिलेल्या समर्पक उत्तराचे समाधान मानत या ठिकाणीच आम्हाला तुमच्याकडून योग्य उत्तर मिळाले असले, तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही शासनाच्या मदतीपासून कोणताही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना सुद्धा केल्या.
यावेळी विनोद घोसाळकर यांच्या सोबत जिल्हाप्रमुख राजू राठोड, उपजिल्हाप्रमुख विठ्ठर बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, उपजिल्हा संघटक रावसाहेब गोराडे, तालुका उपप्रमुख रामेश्वर काळे, तालुका उपप्रमुख शिवा दादा गौर, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, उप तालुका प्रमुख नारायण आहेर, तालुका उपसंघटक भास्कर आहेर, युवा जिल्हाधिकारी केके जाधव, सिल्लोड शहर प्रमुख मच्छिंद्र धाडगे, तालुका संघटक अमोल शिंदे, विभाग प्रमुख गजानन जैस्वाल, शंकर रोठे, प्रभाकर शिंदे, रामेश्वर एंडोले, दिनकर तांबे, महादु गुंजाळ, नथ्थू मोरे, कृष्णा जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.